गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (13:49 IST)

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर संतापले संजय राउत, म्हणाले-'हिम्मत आहे तर आरोपींचा करा एनकाउंटर'

sanjay raut
बाबा सिद्दीकी हत्याकांडसोबत जोडलेल्या अनेक प्रकारणांबद्दल शिवसेना (UBT) नेते संजय राउत यांनी मोठा जबाब दिला आहे. संजय राउत सरकारवर निशाणा साधत म्हणाले की, बाबा सिद्दीकी यांच्यावर ज्यांनी गोळीबार केला, जो या घटनेचा सूत्रधार आहे त्यांचा एनकाउंटर करा. 
 
मिळालेल्या माहितीनुसार एनसीपी अजित पवारगट नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोंबरला गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी 15 टीम बनवून या प्रकरणांची चौकशी सुरु केली आहे. 
 
तर, शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राउत यांनी राज्य सरकार वर गंभीप आरोप केले आहे. राउत म्हणाले की, मी पहिले देखील सांगितले होते.  हे सरकार आल्यानंतर मुंबईत टोळीयुद्ध आणि अंडरवर्ल्डचा वावर वाढू शकतो असे देखील ते म्हणाले.
 
तसेच संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करावी. त्यांनी अक्षय शिंदे बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी) याला गोळ्या घालून स्वतःला सिंघम घोषित केले होते. आता इथे 'सिंघमगिरी' दाखवा. तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही माणूस असाल तर बाबा सिद्दीकी खून प्रकरणाच्या सूत्रधारांचा सामना करा असे राऊत म्हणाले.

Edited By- Dhanashri Naik