बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (08:51 IST)

चैत्यभूमीच्या सुशोभीकरण होणार, 29 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीच्या सुशोभीकरण करण्यात येणार आहे. चैत्यभूमी दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी पालिकेने राखीव निधीतून 29 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. 
 
हा निधी राखून ठेवला असून, त्यातून त्वरित दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी आराखडे, संकल्पचित्र बनवून हे काम तातडीने हाती घ्यावे. या कामाबद्दल पुढील स्थायी समितीमध्ये प्रशासनाने निवेदन करावे, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. 
 
चैत्यभूमीच्या पुनर्बांधणीसाठी वास्तुविशारदाची नियुक्ती होऊन एक वर्ष लोटले तरीही दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे चैत्यभूमीच्या दुरुस्ती तसेच पुनर्बांधणीचे काम महापालिकेच्या तिजोरीतून तातडीने सुरू करावे, अशी मागणी भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी बुधवारी स्थायी समितीत केली.