सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2024 (21:30 IST)

मुंबई विमानतळावर 2.50 कोटी रुपयांचा गांजा पकडला, आरोपीला अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2.50 कोटी रुपयांच्या गांजाची तस्करी उधळून लावत अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाला अटक केली. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर संचालनालयाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर  2.50 कोटी रुपयांचा गांजा पकडला आहे. या प्रकरणात केरळ मधील एका 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मुंबई युनिटच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी बॅंकॉकहुन येणाऱ्या एका प्रवाशाला संशयावरून थांबवले आणि त्याची तपासणी घेतली असता त्याच्या सामानात मोठ्या प्रमाणात गांजा सापडला.  
 
डीआरआय मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी 1 जुलै रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाला अवैध वस्तू बाळगल्याच्या संशयावरून अटक केली. यानंतर अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या बॅगची कसून तपासणी केली असता त्यामध्ये व्हॅक्यूम पॅक असलेली चांदीची रंगाची नऊ पॅकेट आढळून आली. पिशव्यांवर वेगवेगळ्या फळांच्या खुणा होत्या. सर्व 9 पाकिटे उघडून तपासली असता त्यात हिरव्या रंगाचा पदार्थ आढळून आला. यानंतर एनडीपीएस चाचणी किटच्या मदतीने चाचणी केली असता तो पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले. 

डीआरआय ने प्रवाशाकडून गांजा जप्त केला असून त्याला अटक केली आहे. हा गांजा त्याने कुठून आणला याचा पुढील तपास  अधिकारी करत आहे.

Edited by - Priya Dixit