रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (16:15 IST)

दहिसर येथे भांडणात अध्यक्षांनी सोसायटीच्या सदस्याचा अंगठा चावला,गुन्हा दाखल

pitai
मुंबईतील एका गृहनिर्माण सोसायटीच्या मिटिंग मध्ये झालेल्या किरकोळ वादात रागाच्या भरात येऊन सोसायटीच्या अध्यक्षाने सदस्याचा अंगठाचा चावा घेतला की पीडितचा अंगठाच कापला गेला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

सदर घटना मुंबई उपनगरातील दहिसर परिसरात रविवारी सोसायटीच्या वतीने सदस्यांसाठी मिटिंग आयोजित करण्यात आली. या मिटिंग मध्ये सदस्य आणि अध्यक्षाच्या मध्ये किरकोळ वाद झाला नंतर हाणामारी सुरु झाली. या हाणामारीत अध्यक्षाने सदस्याच्या अंगठ्याला चावा घेतला. 
 
या मध्ये त्यांचा अंगठा कापला गेला. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या अंगठ्याचे दोन तुकडे झाले असून त्यांना गंभीर संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी अध्यक्षांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा तपास करत असून परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit