गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (22:25 IST)

IIT मुंबईत बाथरूममध्ये विद्यार्थिनीचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनविल्याचा प्रकार उघडकीस

There are reports that a similar incident has happened from IIT Mumbai
चंदीगड मध्ये बाथरूम मधील तब्बल 60 विद्यार्थिनींचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाल्याच्या प्रकरण्याच्या बातमीनंतर आता IIT मुंबईतून अशाच एक धक्कादायक प्रकार घडला असल्याचे वृत्त मिळत आहे. मुम्बईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील एका विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार केली की, रविवारी रात्री वसतिगृहाच्या बाथरूम मधील एक आक्षेपार्ह व्हिडीओ कँटीन मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने बनवला. या प्रकरणात कँटिनमधील काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. पिंटू गरिया असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

पीडित विद्यार्थिनीने पवईच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली की, रविवारी रात्रीच्या सुमारास रात्री कँटीन मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वसतिगृह 10 च्या बाथरूम मध्ये पाईप वरून चढून तिचा अश्लील व्हिडीओ बनवला .तिने त्या कर्मचाऱ्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी कर्मचाऱ्याला बोलावून चौकशी केली आणि त्याला अटक केले.परिसरातील कँटीन बंद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून आम्ही पीडित विद्यार्थिनीच्या पाठीशी असल्याचे आयआयटी मुंबई याने म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.