गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (11:03 IST)

गुप्तचर यंत्रणेचा इशारा;लोकल ट्रेन मध्ये Gas Attack होणार, अलर्ट जारी

अलीकडेच दिल्ली स्पेशल सेलने 6 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.यातील एक आरोपी मुंबईतील धारावी परिसरातील रहिवासी आहे. दिल्ली स्पेशल सेलच्या सूत्रांनी सांगितले की,अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांना मुंबईच्या लोकल ट्रेनसह देशातील विविध भागात दहशतवादी कट रचण्याची योजना आखली होती सूत्रांनी असेही सांगितले आहे की, रेल्वे पोलिसांना म्हणजेच जीआरपीला एजन्सींकडून संभाव्य दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली होती
 
सध्या देशात दहशतवादी काही मोठं षडयंत्र करण्याच्या योजना रचत आहे. दररोज दहशत वादांकडून षडयंत्राबाबत नवेनवे खुलासे होत आहे.दिल्लीतून सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीवरून समजले आहे की या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश निवडणुका होत्या.या शिवाय मुंबईतील लोकल मध्ये Gas Attack करण्याचा डाव होता.
 
आज मुंबईतून अटक केलेल्या दहशतवाद्यांनी सांगितले की लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा विचार देखील होता.रेल्वे पोलिसानांनुसार विविध एजेन्सी कडून मुंबईत हल्ला करण्याच्या धमक्या मिळत आहे.त्यांच्या या धमक्यांकडे आमचे विशेष लक्ष आहे.त्यासाठी आम्ही विशिष्ट पावले उचलत आहोत.एन सणासुदीच्या काळात या दहशतवाद्यांकडून मुबंईत लोकल ट्रेनमध्ये स्फोट करण्याचा कट रचला जात होता.यासाठी त्यांनी रेकीसुद्धा केल्याची माहिती मिळाली आहे.
 
या साठी मुंबईत लोकलच्या सुरक्षेबाबत हायअलर्ट देण्यात आले आहे.सध्या मुंबई लोकल मध्ये आणि विविध स्थानकांवर बॉंबशोधक पथक,सीसीटीव्ही,बॅग स्कॅनर मशीन,रेडम चेकिंग द्वारे सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.नागिरकांच्या सुरक्षेबाबत सज्ज असून या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहे.
 
जीआरपीने सर्वत्र बॅरिकेड्स आणि स्पीड ब्रेकर लावले आहेत जिथून कोणतेही वाहन (कार किंवा इतर चारचाकी) प्लॅटफॉर्मवर जाऊ शकते.दहशतवाद्यांची दहशत पसरवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त लोक दगावू शकतात.
 
रेल्वे पोलिस आता पार्सल बुकिंगकडेही लक्ष देत आहेत आणि तपास करत आहेत. जीआरपी अधिकाऱ्याच्या मते, संपूर्ण रेल्वेमध्ये (मध्य आणि पश्चिम) सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जीआरपी आणखी कॅमेरे बसवणार आहे जेणेकरून उर्वरित ठिकाणे कव्हर केली जाऊ शकतील.