सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (09:55 IST)

मुंबईतून संशयित दहशतवादी ताब्यात, 1993 च्या बॉम्बस्फोटाच्या धर्तीवर हादरण्याची तयारी होती

मुंबईतही एटीएसनं मोठी कामगिरी केली असून महाराष्ट्र एटीएसनं मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव झाकीर असल्याची माहिती समोर आली आहे. 
 
महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केल्याप्रकरणी मुंबईतील एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी झाकीरला शनिवारी सकाळी मुंबईच्या जोगेश्वरी भागातून अटक करण्यात आली आहे.
 
झाकीरला यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने दहशतवादी जान मोहम्मद शेख उर्फ ​​समीर कालियाकडून शस्त्रे आणि स्फोटके मुंबईत आणल्याप्रकरणी अटक केली होती. मंगळवारी, दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि पाकिस्तान-आयएसआय प्रशिक्षित दोन दहशतवाद्यांसह सहा जणांना अटक केली.
 
महाराष्ट्र एटीएसनं जोगेश्वरी परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्या व्यक्तीचे नाव झाकीर असं आहे. महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिस यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठा घातपाताचा कट उधळला होता. ६ दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली होती. त्याच प्रकरणात झाकीरलाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
 
सूत्रांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने अटक केलेल्या सहा आरोपींच्या चौकशीतून हे स्पष्ट झाले की ते 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या धर्तीवर हल्ल्याची योजना आखत होते. पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून सुमारे 1.5 किलो आरडीएक्स जप्त केले. अटक केलेल्या दहशतवाद्यांनी काही लोकांची नावे दिली आहेत जे दहशतवादी मॉड्यूलला मदत करण्यासाठी स्लीपर सेल म्हणून काम करत होते.