रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (08:46 IST)

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी जयदीप आपटेला अटक, दोन आठवड्यांनंतर पोलिसांना यश

arrested
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. तसेच छत्रपती शिवरायांचा पुतळा बनवणाऱ्याला पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जयदीप आपटे याला पोलिसांनी कल्याण येथून अटक केली आहे. दोन आठवड्यांनंतर जयदीप आपटेला पोलिसांनी पकडले.
 
यापूर्वी एका आरोपीला अटक करण्यात आली होती-
त्याचबरोबर या प्रकरणातील एका आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आरोपी चेतन पाटील या स्ट्रक्चरल कन्सल्टंटवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच यानंतर पोलीस कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील चेतन पाटील यांच्या घरी गेले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.