मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (07:42 IST)

सासरा सूनेच्या तोंडावर थुंकतो, शिवसेना पदाधिकाऱ्याचा विडीओ व्हायरल

मुंबईतील कल्याण येथे घरगूती वादातून सासरा सूनेच्या तोंडावर थुंकल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका शिवसेना पदाधिकाऱ्याचा असून सुनेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र हे सर्व भाजपा नेत्यांचे कटकारस्थान असून सर्व आरोप खोटे असल्याचा दावा शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील यांनी केला आहे. 
 
या घटनेत भोपर गावातील हर्षला पाटील यांनी सोशल मीडियावर शिवसेना नेता व सासरे एकनाथ पाटील तोंडावर थुंकल्याचा व्हिडीओ शेअर करक पोलिसांकडे कारवाईसाठी विनंती केली होती. सासरे एकनाथ पाटील गेल्या काही वर्षांपासून मानसिक त्रास देत असल्याचा तसंच मारहाणीचा आरोप त्यांनी केला.
 
दरम्यान कल्याण तालुक्याचे विधानसभा संघटक असणारे एकनाथ पाटील यांचं म्हणणं आहे की, “मी ५५ वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्यावर कोणीही असा आरोप केला नाही. हा व्हिडीओ आहे दोन वर्षांपूर्वीचा आहे. पोलिसांनी आमच्यातील वाट मिटवला होता. भाजपाच्या संदीप माळी यांनी राजकीय फायद्यासाठी सूनेला हाताशी धरुन माझी बदनामी सुरु केली आहे. हे सर्व आरोप खोटे आहेत’.
 
दरम्यान भाजपाचे संदीप माळी यांनी पाटील यांच्या घरगुती वादाशी माझा काही संबंध नाही, चुकीचे आरोप केल्यास त्यांना न्यायालयात खेचणार असा इशारा दिला आहे.