सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (08:37 IST)

कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक विशाल मेवाणी यांचा लिफ्टच्या शॉफ्टमध्ये अडकून मृत्यू

मुंबई येथील प्रसिद्ध अशी रिटेल साखळी कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्सचे  संचालक विशाल मेवाणी (वय 46) यांचा वरळी येथे इमारतीच्या लिफ्टखाली येऊन मृत्यू झाला.कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्सच्या संचालकांचा लिफ्टच्या शॉफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. ते आपल्या मित्राला भेटण्यासाठी वरळीतील दुमजली इमारत ‘ब्यूना विस्ता’ येथे गेले होते.
 
मेवाणी हे दुसऱ्या मजल्यावर पोहचण्यासाठी ते लिफ्टमध्ये गेले असता त्यांना ते शॉफ्ट मध्ये असल्याचे वाटले. परंतु त्यावेळी मेवाणी यांनी त्यामधून बाहेर निघण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न अयशस्वी ठरले आणि वरुन आलेल्या लिफ्टच्या खाली दबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.अधिकाऱ्यांनी या प्रकरणी अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाबद्दल कळले असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहचल्यावर मेवाणी यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ब्रीच कॅन्डी येथील रुग्णालयात सुद्धा घेऊन जाण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.