सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (10:23 IST)

‘आदिपुरुष’ चे मोशन पोस्टर रिलीज

दिग्दर्शक ओम राऊत एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ओम राऊत यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टरदेखील रिलीज करण्यात आलं. 
 
आदिपुरुष’च्या प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरुन या चित्रपटातून प्रभू श्री रामचंद्र यांच्या जीवनावर भाष्य करण्यात येणार असल्याचं दिसून येत आहे. या पोस्टरमध्ये Celebrating Victory of Good over Evil असं लिहिण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये श्रीरामांचे धनुष्यबाण दिसत आहे. तर दुसरीकडे हनुमान आणि रावणही दिसत आहे. 
 
‘आदिपुरुष’ हा चित्रपट 3D अ‍ॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा आहे. भूषण कुमार यांनी याची निर्मिती केली आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित होणार  आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.