गणेश विसर्जन सोहळ्याची सांगता: मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा'चे गिरगाव चौपाटीवर साश्रू नयनांनी विसर्जन
अनंत चतुर्दशीच्या उत्तरार्धात आज सकाळी मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा' आणि 'चिंचपोकळीचा चिंतामणी' या मानाच्या गणपतींचे गिरगाव चौपाटीवर साश्रू नयनांनी विसर्जन झाले.
२६ तासांच्या आणि ८ किलोमीटरच्या मिरवणुकीनंतर मुंबईतील अरबी समुद्रात लालबागच्या राजाचे विसर्जन करून अखेरचा निरोप देण्यात आला. लालबागच्या राजाचे विसर्जन गिरगाव चौपाटी येथे पार पडले. समुद्रातील खवळलेल्या लाटा आणि पाण्याच्या पातळीमुळे विसर्जन प्रक्रियेला विलंब झाला. मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती.
मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटी येथे पार पडली. ढोल-ताशांच्या गजरात आणि भावपूर्ण वातावरणात, आपल्या लाडक्या बाप्पाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. तथापि, समुद्रातील भरती-ओहोटीच्या परिस्थितीमुळे यावेळीही लालबागच्या राजाच्या विसर्जनास विलंब झाला.#WATCH | Maharashtra: The iconic Lalbaugcha Raja Ganpati idol reaches Girgaum Chowpatty in Mumbai for immersion. Reliance Industries Executive Director and Vantara Founder Anant Ambani is also participating in this idol immersion. pic.twitter.com/nqZwcftuJL
— ANI (@ANI) September 26, 2026
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी दुपारी १२ वाजता सुरुवात झाली. शनिवारी सकाळी १०:४६ वाजता, मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात अधिकृतपणे विसर्जन करण्यात आले. २६ तास चाललेल्या भव्य, ८ किलोमीटर लांबीच्या मिरवणुकीनंतर बाप्पाला एक भव्य आणि भावनिक निरोप देण्यात आला.
Edited By- Dhanashri Naik

