गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified बुधवार, 30 मार्च 2022 (11:35 IST)

लातूर- मुंबई एक्स्प्रेसच्या इंजिनातील बिघाड दुरुस्त केले

बदलापूर- अंबरनाथ रेल्वे स्थानकाला दरम्यान लातूर-मुंबई एक्स्प्रेसच्या ईंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे रुळावर बंद पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आता इंजिन मधील बिघाड दुरुस्त केल्यामुळे वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. 

या वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबईकडे येणाऱ्या लोकल वर देखील झाला. सकाळी मुंबईतील नोकरदार वर्ग कामाला जाण्यासाठी निघतात त्यामुळे लोकल पकडणाऱ्यांची रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी असते. अशा परिस्थितीत रेल्वेचे इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. आता इंजिनचे बिघाड दुरुस्त केले असून वाहतूक पुन्हा पूर्ववत झाल्याचे वृत्त आहे.