1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 5 मार्च 2020 (13:57 IST)

राजकारण सोडून लेखक व्हा : अजितदादा

'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक पाहिले तर फडणवीस हे उत्तम साहित्कि होऊ शकतात असे मला जाणवायला लागले आहे. त्यामुळे तुम्ही राजकारण सोडून लेखक व्हायला काही हरकत नाही, असा टोलावजा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांना दिला.
 
फडणवीस यांनी लिहिलेले पुस्तक अत्यंत चांगले आहे. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगण्याचे काम केले आहे. हे पुस्तक वाचून ते उत्तम साहित्यिक होऊ शकतात याची खात्री पटली असे सांगतानाच भाजप नेते राम नाईक तुम्हीही या कार्यक्रमाला हजर आहात. तुम्ही जरा वर दिल्लीला सांगितले की हे साहित्यिक आहेत, यांना बरेच ज्ञान आहे आणि फडणवीसांच्या ज्ञानाचा आपण दिल्लीत वापर करून घेऊ. तर महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाची त्याला एकमताने मान्यता राहील. असे झाल्यास  सुधीर मुनगंटीवार यांनाच त्याचा सर्वाधिक आनंद होईल. गळ्याची आण खोटे बोलत नाही, असा चिमटा अजित पवार यांनी काढताच सभागृहात एकच खसखस पिकली.