सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (15:06 IST)

वानखेडे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक , मलिक यांचा दावा

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधलाय. वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा मलिक यांनी केलाय. ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत मलिक यांनी निशाणा साधलाय. सोबतच समीर वानखेडे अल्पवयीन असतानाच त्यांच्या वडिलांनी समीर यांच्या नावावर बारचं परमीट घेतलं होतं, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
 
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. ज्ञानदेव वानखेडे हे 1997मध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट काढलं होतं. त्याची नोंद ठाणे जिल्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावानं हे परमीट घेण्यात आलं. त्यावेळी समीर यांचं वय होतं. 17 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस. बाप उत्पादन शुल्क विभागात काम करत होता. त्यामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलाला बारचं परमीट दिलं. हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे, असं मलिक म्हणाले. वानखेडे यांच्या नावावर वाशी येथे हा बार आहे. या बारचं परमीट नुतनीकरणही करण्यात आलं आहे. 31 मार्च 2022पर्यंत या बारचं परमीट नुतनीकरण करण्यात आलं आहे. हे बार आणि रेस्टॉरंट आहे असे सांगितले.