रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (15:49 IST)

बनावट नोटांवरून नवाब मलिकांचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर नवीन आरोप, म्हणाले…

मंबई एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सातत्याने धक्कादायक आरोप करणारे राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आणखी एक आरोपाचा बाॅम्ब टाकला आहे. ‘नाव समीर दाऊद वानखेडे आणि त्यांचा धर्म मुस्लीम लिहीला असल्याचा कागदपत्रांचे पुरावे समोर आणले आहेत. यावेळी समीर वानखेडे हे खोटे कागपत्र आणि खोट्या नोटांचे मास्टर असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
 
मागील काही दिवसांपासून मुंबई ड्रग्ज प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नवाब मलिकांनी वानखेडे यांच्यावर केलेले आरोप हे खळबळून सोडणारे आहेत. रोज नवे खुलासे समोर येत असल्याने राजकीय वर्तुळातही चांगल्यांच चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, समीर वानखेडेंच्या बद्दलचे खरे कागदपत्र आम्ही न्यायालयालमोर ठेवले आहेत. वानखेडेंनी सर्व महानगरपालिकेच्या (BMC) कागपत्रांवर खाडा-खोड करून 1993 साली नवा रेकॉर्ड तयार केला. तसेच कागदपत्र गहाळ करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र त्यांना माहिती नव्हतं की हे स्कॅन करून ठेवलेले असतात. याच आधारावर ते सर्व करत आहेत, मात्र त्यांच्या जन्मापासूनच फर्जीवाडा सुरू असल्याचा आरोप नवाब मलिकांनी (Nawab Malik) केला आहे.