सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 2 नोव्हेंबर 2024 (08:02 IST)

मुंबई मधील अंधेरी मध्ये भीषण आग, अनेक झोपड्या प्रभावित

fire
मुंबईतील अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील सुभाष नगरमध्ये भीषण आग लागली. तसेच फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत सुमारे 50 झोपड्या जळून खाक झाल्या आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. 
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील सुभाष नगरमध्ये भीषण आग लागली. फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत सुमारे 50 झोपड्या जळून खाक झाल्याची माहिती समोर आलीअसून  मारुती शाळेजवळील भांगरवाडी झोपडपट्टीत सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली. आगीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. 
 
माहिती समोर आली आहे की, फटाक्यांमुळे प्रथम एका झोपडीला आग लागली, त्यानंतर अनेक झोपड्या आगीच्या विळख्यात सापडल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. आगीमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. 
 
 Edited By- Dhanashri Naik