मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 11 मे 2020 (11:58 IST)

मटका किंग रतन खत्री याचं मुंबईत निधन

आकड्यांच्या जुगाराच्या खेळात स्वतःचं वर्चस्व निर्माण  करणारा मटका किंग रतन खत्री याचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. तो 88 वर्षांचा होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्यातच त्याचं निधन झालं.

1960च्या दशकात मटका मुंबईतील सर्वच स्तरांत प्रचलित होता. कल्याण  भगत यानं 1962 मध्ये 'वरळी मटका' सुरू केला. रतन खत्री यानं त्याचा मॅनेजर म्हणून कामाला सुरुवात केली. मात्र, दोनच वर्षांत भगतची साथ सोडून रतन खत्री यानं स्वतःचा 'रतन मटका' सुरू केला.

एका भांड्यातून चिठ्ठी काढून खेळला जाणारा हा जुगार इतका लोकप्रिय झाला की त्याची दिवसाची उलाढाल 1 कोटींपर्यंत गेली. मटकच्या लोकप्रियतेबरोबर रतन खत्रीचेही नाव झाले. हळूहळू मुंबईत तो 'मटका किंग' म्हणून ओळखला जाऊ लागला होता. रतन खत्री हा मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत राहत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. या आजारपणातून तो सावरला नाही. शनिवारी सकाळी त्यानं अखेरचा श्वास घेतला