रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (21:27 IST)

पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार,आरोपींना अटक

rape
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरात 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने आरोपी सोनूने तिला नालासोपारा येथील एका निर्जन ठिकाणी नेले आणि तेथे त्याने त्याच्या मित्रासह तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने घरी जाऊन हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची मैत्रीण नालासोपाऱ्यात राहायची तिला भेटायला तरुणी जायची.मैत्रिणीच्या शेजारी एका फोटो स्टुडियो मध्ये काम करणाऱ्या एका तरुणाशी तिची ओळख झाली. त्या तरुणाने तरुणीला भेटायला नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या जवळ भेटायला बोलावलं. तरुणाच्या सोबत त्याचा एक मित्र होता. त्यांनी तिला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित तरुणीने घरी आल्यावर आपल्या पालकांना घडलेले सांगितले.  

पालकांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सोच्या अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit