1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (09:12 IST)

BMC चं “मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग”, 30 मिनिटांत होणार COVID-19चं निदान

मुंबई महापालिकेने “मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग” हे मिशन हाती घेतलं आहे. याची विशेष बाब म्हणजे यात अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल मिळणार आहे. त्यासाठी Antigen Tests एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. 
 
ICMR ने मान्यता दिलेल्या एसडी बायोसेन्सर या एकमेव कंपनीच्या कीटद्वारे अँन्टीजेन टेस्टींग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचा उपयोग करुन कोरोना हॉटस्पॉट किंवा प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये तसेच अति जोखमीच्या आणि कोरोनासह इतर आजार असलेल्या रुग्णांची चाचणी करुन तातडीने बाधा निश्चिती करण्यात येते. या चाचणीचा परिणाम 30 मिनिटांच्या आत प्राप्त होत असल्याने बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होते.
 
शासनाने रॅपिड टेस्टींग कीट खरेदी करुन कॉर्पोरेट हाऊसेस, खासगी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यास सुचवले आहे.