शनिवार, 22 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2025 (18:10 IST)

'अभिजात'चा होणार भव्य आरंभ, राज ठाकरेंनी जनतेला केले आवाहन, म्हणाले- मराठी भाषा ही आपली ओळख आहे

raj thackeray
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा अभिमान दिनानिमित्त, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एका भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी जनतेला सामील होण्याचे आवाहन केले आहे.
तसेच हे पुस्तक प्रदर्शन २ मार्च २०२५ पर्यंत चार दिवस चालेल. महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तके घेऊन येत आहे. अशी माहीत समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, मला विश्वास आहे की हे मराठी साहित्याचे प्रदर्शन करणारे सर्वात मोठे पुस्तक प्रदर्शन असेल. या प्रदर्शनाच्या औपचारिक उद्घाटनानंतर, १७ कलाकार त्यांच्या कविता आणि त्यांचे विचार लोकांसमोर मांडतील. इतक्या मान्यवरांच्या तोंडून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल असा राज ठाकरे यांचा विश्वास आहे आणि त्यांनी हा अनुभव घेण्यासाठी प्रदर्शनात येण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून जनतेला आवाहन केले
राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुम्ही तुमच्या कुटुंबाला या पुस्तक प्रदर्शनात घेऊन यावे. आपली मराठी भाषा ही आपली ओळख आहे आणि आपली ताकद देखील आहे. तसेच त्यांनी पुढे लिहिले की, या भाषेत किती साहित्य आणि विचार निर्माण झाले आहे हे भावी पिढ्यांना कळले पाहिजे.  
Edited By- Dhanashri Naik