गंगेतील मृतदेहांबाबत मोहन भागवतांनी भाष्य करावे; संजय राऊतांचे आवाहन

sanjay raut
मुंबई| Last Modified मंगळवार, 25 मे 2021 (19:40 IST)
गंगा नदीत मृतदेहांचा खच आढळून आला आहे. या मुद्द्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य करावं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. गंगा नदीत मृतदेह सापडले. राम मंदिरा इतकाच हा महत्त्वाचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे भागवत यांनी त्यावर बोलावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना हे आवाहन केलं. भागवत हे आदरणीय आहेत. त्यांचा आम्ही आदर करतो. त्यांनी परखडपणे मत व्यक्त करावं, अशी आमची अपेक्षा आहे. त्यांच्या मताला देशात आजही महत्त्व आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषत: गंगेच्या प्रवाहात हजारो मृतदेह वाहून आले. त्यांच्यावर धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वाचा होता. राम मंदिरा इतकाच हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा होती. मोहन भागवत यांनीही त्यावर भाष्य केलं पाहिजे. भागवत यांनी या मुद्द्यावर बोलावं, असं मी त्यांना आवाहन करतो, असं राऊत म्हणाले.
विधान परिषद सदस्यांची यादी सापडली ही आनंदाची गोष्ट आहे. त्यावर राज्यपालांनी सही केली तर संपूर्ण राजभवनात आम्ही पेढे वाटू, असा चिमटा काढतानाच फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवली नाही. बरं भूतं असली तरी ती त्यांच्या आसपासचीच असतील, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

राज्यपाल त्या फायलीवर का सही करत नाहीत? ती काय बोफोर्सची फाईल आहे का? की कुठल्या भ्रष्टाचाराची फाईल आहे? असा सवाल करतानाच सहा-आठ महिने झाले तरी या फायलीवर सही होत नाही. हे महाराष्ट्राच्या गतीमान प्रशासनाच्या कारभाराला शोभणारं नाही. राज्यपालांनी ही गतिमानता दाखवावी, असं आवाहनही त्यांनी केलं.


यावर अधिक वाचा :

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...

क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवं : जितेंद्र आव्हाड

क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवं : जितेंद्र आव्हाड
मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर ...

मुंबई महानगरपालिकेत भंगार घोटाळा

मुंबई महानगरपालिकेत भंगार घोटाळा
मुंबई महानगरपालिकेत विविध विभागामध्ये जुने निरुपयोगी भंगार सामानाचा लिलाव करण्यासाठी ...

सर्व मंत्रालये आणि केंद्रीय विभागाने Air Indiaचे थकबाकी ...

सर्व मंत्रालये आणि केंद्रीय विभागाने Air Indiaचे थकबाकी त्वरित चुकवावी लागणार : वित्त मंत्रालय
अर्थ मंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि केंद्र सरकारच्या सर्व विभागांना एअर इंडियाची थकबाकी ...

फॅशन उद्योगात Relianceचे आणखी एक पाऊल, भारताचे ट्रेडमार्क ...

फॅशन उद्योगात Relianceचे आणखी एक पाऊल, भारताचे ट्रेडमार्क अधिकार Lee Cooperसाठी विकत घेतले
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने मनीष मल्होत्रा आणि रितू कुमार यांच्यासोबत भागीदारी ...

आर्यन खानसह ३ जणांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा गुरूवारी ...

आर्यन खानसह ३ जणांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा गुरूवारी दुपारी युक्तिवाद
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपी असलेले आर्यन, अरबाज आणि मूनमूनचा युक्तीवाद मुंबई उच्च ...