शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (10:37 IST)

मुंबईतील चेंबूर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकावर आदळली

चेंबूर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रविवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला आहे. सुसाट वेगात असणारी भरधाव कार डिव्हायडरवर आदळल्याने मोठा अपघात झाला. हा अपघात मुंबईतील चेंबूर परिसरात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांना अपघताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहाणी केली.
 
या अपघाताची भीषणता दाखवणारे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. या कारचा वेग खूप जास्त होता आणि अचानक कार डिव्हायडरवर आदळल्यानं पुढच्या काचा फुटल्या आणि टायर आणि बोनेटचंही मोठं नुकसान झालं. सायन-चेंबूर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रविवारी रात्री उशिरा हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
 
हा अपघात नेमका कसा झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही. कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं की चालक नशेत असल्यानं हा अपघात झाला याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं आहे तर प्रवास करणारे दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून सध्या या अपघाताप्रकरणी तपास सुरू आहे.