सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (16:16 IST)

फिल्मसिटीबाबत मनसे मुख्यमंत्र्यांसोबत, पाहा मनसे काय म्हणते

मुंबईतून बॉलिवूड संपवण्याचे किंवा ते हलविण्याचे प्रयत्न खपवून घेणार नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर मनसेने देखील याच विषयाची री ओढत बॉलिवूडची नाहक बदनामी करणाऱ्यांना इशारा दिला आहे. मनसे चित्रपट सेनेचे नेते अविनाश खोपकर यांनी ट्विट करत “फिल्मसिटी मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय.” असे सांगत मनसे हे कारस्थान पुर्ण होऊ देणार नाही, असा इशारा खोपकर यांनी दिला.
 
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी देखील बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांवर टीका केली. “भूतकाळातही बॉलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बॉलीवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय, एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय.”