1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (21:41 IST)

मुंबईत अंधेरी ते बोरिवलीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक

Mumbai has the highest number of active patients from Andheri to Borivali maharashtra news mumbai news
कोरोनाचा संसर्ग मुंबईत झपाट्याने वाढू लागला आहे. गोरेगाव, वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व - पश्चिम आणि चेंबूर असे काही विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत. तर पश्चिम उपनगरात अंधेरी ते बोरिवलीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.  दररोज सरासरी आठ ते नऊ हजार बाधित रुग्णांची नोंद होत आहे. सुरुवातीला चेंबूर, गोवंडी, वांद्रे या काही विभागांमध्ये रुग्ण वाढ दिसून येत होती. मात्र आता सर्वाच विभागांमध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. 
मुंबईतील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी होऊन ४४ दिवसांवर आला आहे. गोरेगाव विभागात हेच प्रमाण ३३ दिवस, वांद्रे पश्चिम येथे ३४ दिवस, अंधेरी पूर्व - जोगेश्वरी येथे ३७ दिवसांमध्ये, चेंबूर - गोवंडी विभागात ३७ दिवस आणि अंधेरी प. येथे ३८ दिवसांमध्ये रुग्ण संख्या दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. दररोज सुमारे ४२ ते ४५ हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. 
 
सर्वाधिक सक्रिय रुग्ण 
के पश्चिम...अंधेरी प. ४८४९
के पूर्व...अंधेरी पूर्व, जोगेश्वरी...४१७१
आर मध्य...३५४९
आर दक्षिण...३४८४
पी उत्तर....३४२३