शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (09:51 IST)

मुंबईत आतापर्यंत डेल्टा प्लसचा 1 ही रुग्ण आढळलेला नाही

मुंबईत आतापर्यंत डेल्टा प्लसचा 1 ही रुग्ण आढळला नाही आहेत. यात पालिकेने ३७४ नमुन्यांच्या चाचण्या केल्या असूनही एकही डेल्टा प्लसचा रुग्ण आढळलेला नाही. डेल्टाचा प्रादुर्भाव मात्र मुंबईत सर्वाधिक असून यातील ८१ टक्के नमुने हे डेल्टाचे आढळले आहेत.

कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेत दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्या केल्या आहेत. याचा अहवाल नुकताच पालिकेने जाहीर केला असून यात ३७४ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यातील ८१ टक्के म्हणजेच ३०४ नमुने ‘डेल्टाचे असल्याचे आढळले आहे. ‘नाईन्टीन-ए’ (१९अ) उप प्रकारातील २ आणि ‘ट्वेन्टी-ए’ (२०अ) उप प्रकारातील ४ नमुने आणि उर्वरित ६६ नमुने हे सर्वसाधारण करोना विषाणूचे आहेत. पहिल्या चाचण्यांमध्ये डेल्टाचे प्रमाण जवळपास ६८ टक्के आढळले होते.पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही टप्प्यातील नमुन्यांमध्ये ‘डेल्टा प्लस’ या उपप्रकारातील एकही नमुना आढळलेला नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
कस्तुरबामध्ये पहिल्यांदाच केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंग मध्ये १२८ डेल्टा बाधित होते. यातील ९३ नमुने हे मुंबईतील रुग्णांचे असून ४५ पुरुष ४८ स्त्रियांचा समावेश होता. तसेच ५४ व्यक्तींना म्हणजेच ५८ टक्के व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. तर उर्वरित ४२ टक्के म्हणजेच ४० व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. रुग्णांपैकी ४७ रुग्णांनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती.