सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (10:18 IST)

दुर्देवी! टूथपेस्ट समजून विषारी औषधाने दात घासल्याने मुलीचा मृत्यू

मुंबईत धारावी परिसरात एक दुर्देवी धक्कादायक घटना घडली.टूथपेस्ट समजून एका मुलीने उंदीर मारण्याच्या विषारी औषधाने दात घासल्याने त्या मुलीचा मृत्यू झाला. मयत झालेल्या मुली ने दररोज प्रमाणे सकाळी उठल्यावर ब्रश करण्यासाठी टूथपेस्ट समजून विषारी औषध ब्रश ला लावल्यावर तिला पेस्टची चव वेगळी लागली तिला काही समजेल तो पर्यंत उशीर झाला होता.काळाने तिच्यावर झडप घातली आणि तिचा त्या विषारी औषधामुळे दुर्देवी अंत झाला.तिला तातडीने रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले परंतु ते तिला वाचवू शकले नाही आणि मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबातील लोक हादरून गेले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. उंदीर मारण्यासाठीचे औषध घरात आणून ठेवले होते.नकळत ते औषध घेतले गेले.मयत मुलगी धारावीची रहिवाशी होती.या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.