1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जुलै 2024 (19:09 IST)

मुंबई- ठाण्यात सीएनजी -पीएनजीच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Mumbai- Thane
सध्या महागाईने सामान्य माणसांची कंबर मोडली आहे. भाजीपाला, रेशन महाग होत आहे. आता महानगर गॅस लिमिटेड ने मुंबई आणि ठाण्यात सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या दरात1 रुपयांनी वाढ केली आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलोग्रॅम दीड रुपयांने वाढ करण्यात आली आहे. 

नवे दर आज मंगळवार पासून लागू झाले आहे. या वाढीमुळे ग्राहकांना आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. 
मुंबईकरांना एक किलो सीएनजीसाठी 75 रुपये तर घरगुती पीएनजीसाठी 48 रुपये द्यावे लागणार आहे. या दरवाढीमुळे प्रवास महागू शकतात. कारण मुंबईतील बहुधा रिक्षा आणि टॅक्सी सीएनजीवर चालतात. आता सीएनजीच्या किमती वाढल्यामुळे प्रवास महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
आहे.

वाढती मागणी आणि कमी पुरवठा यामुळे महानगर गॅस न CNG आणि PNG च्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. मध्यरात्रीपासून CNG च्या दरात वाढ होणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit