रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (16:18 IST)

नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचा समन्स

नुकतंच एनसीबीनं मुच्छड पानवाला या दक्षिण मुंबईतल्या प्रसिद्ध पानवाल्याला ड्रग्जची साठवणूक आणि पुरवठा प्रकरणी अटक केली आहे. त्याचे अनेक बॉलिवुडकरांशी संबंध असल्याचं देखील समोर आलं आहे. आता एनसीबीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला  एनसीबीनं समन्स बजावलं आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता समीर खान एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाले. 
 
दोन दिवसांपूर्वी एनसीबीनं वांद्रे येथून करन सजनानीला अटक केली होती. करन सजनानी हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ड्रग्ज माफिया असून त्याच्याकडे एनसीबीला तब्बल २०० किलो गांजा सापडला आहे. करन सजनानी आणि समीर खान यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी २० हजार रुपयांचा गुगल पेवरून व्यवहार झाला होता. या प्रकरणात एनसीबीनं चौकशीसाठी समीर खान यांना समन्स बजावलं आहे. ही पैशांची देवाणघेवाण नक्की कशासाठी करण्यात आली होती? याविषयी एनसीबी समीर खान यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.