शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (08:35 IST)

नील सोमय्या यांची मुंबई सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी धाव

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावर त्यास प्रत्युत्तर म्हणून ठाकरे सरकारने खुशाल चौकशी करावी आम्ही न्यायालयात जाणार नाही, असे आव्हान देणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी धाव घेतल्याची माहिती पुढे येत आहे.
 
एकीकडे किरीट सोमय्या संजय राऊतांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र नील सोमय्या अटक टाळण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. २३ फेब्रुवारीला त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. पुत्र नील सोमय्या यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये पीएमसी बँक घोटाळय़ातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार आहेत. या प्रकल्पासाठी सोमय्यांनी ४०० कोटींची जमीन साडेचार कोटींमध्ये विकत घेतल्याचा असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच बाप, बेटे जेलमध्ये जाणार असून कोठडीचे सॅनिटायजेशन सुरु असल्याचेही राऊत यांनी सांगितले होते.