1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (21:18 IST)

त्याचमुळे आता त्यांनी या समाजाची भेट घेतली, राऊत यांनी दिल स्पष्टीकरण

मागील आठवड्यात मुंबई येथे झालेल्या बोहरा समाजाच्या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावत बोरी समाजाच्या विद्यापीठाचे अनावरण केले होते. त्याच ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील भेट दिली आहे. यावरूनच आता राजकारणाला सुरुवात झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी बोहरा समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता उद्धव ठाकरे देखील या समाजाला आपल्याकडे वळवत आहेत का अश्या पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कार्यक्रमासाठी आले होते त्याच कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण होते. मात्र, काही कारणास्तव ते त्या ठिकाणी जाऊ शकले नाही त्याचमुळे आता त्यांनी या समाजाची भेट घेतली आहे. बोहरा समाज आणि शिवसेना यांच्या जुनं नातं आहे. अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून बोहरा समाज नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला आहे. तसेच शिवसेनेने देखील वेळोवेळी बोहरा समाजाला पाठबळ देण्याचं काम केलेले आहे.  शिवसेना आणि बोहरा समाज यांच्या याच ऋणानुबंधनामुळे  उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे त्या समाजाच्या आमंत्रणाला आदर ठेवत उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी भेट दिल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केल.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor