गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2023 (11:57 IST)

मुंबईत हेल्मेटशिवाय स्कूटीवर दोन महिला पोलिसांचा फोटो व्हायरल

वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिस विभागांचे सोशल मीडिया अकाउंट विविध पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करतात. तेव्हाच एका ट्विटर युजरने दोन महिला पोलिसांना हेल्मेटशिवाय स्कूटरवरून जाताना पाहिले. मुंबईत काढलेला हा फोटो आता व्हायरल झाले असून मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर प्रोफाइलने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
राहुल बर्मन यांनी हे छायाचित्र शेअर केले असून त्यात दोन महिला पोलिस हेल्मेटशिवाय स्कूटर चालवताना दिसत आहेत. बर्मन यांनी स्कूटरचा नंबरही शेअर केला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही असा प्रवास केला तर? हे वाहतूक नियमांचे उल्लंघन नाही का?
 
मुंबई वाहतूक पोलिसांनी या ट्विटला प्रत्युत्तर दिले आणि बर्मन यांना आश्वासन दिले की या घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे.