मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 29 जून 2020 (09:19 IST)

आजपासून पश्चिम रेल्वे मार्गावर 40 अतिरिक्त सेवा वाढविण्यात आल्या

मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेची लोकल सेवा सुरू असून आवश्यकतेनुसार याच्या फेऱ्याही वाढविण्यात येत आहे. तसेच लोकलमधील गर्दीचे दृश्य बघता पश्चिम रेल्वेने निर्णय घेतला आहे.
 
पश्चिम रेल्वे मार्गावर 40 अतिरिक्त सेवा वाढविण्यात आल्या आहे. 29 जून पासून या 40 अतिरिक्त सेवा पश्चिम रेल्वेअंतर्गत सुरू होती. त्यानुसार आता पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्या 202 पर्यंत पोहोचला आहे.
 
- चर्चगेट ते बोरीवलीदरम्यान 20 धीम्या लोकल (10 अप आणि 10 डाऊन मार्गावर)
- बोरीवली ते वसई रोड दरम्यान 2 लोकल धीम्या मार्गावर
- वसई ते चर्चगेट दरम्यान 2 जलद लोकल (अप मार्गावर)
- विरार ते बोरीवली दरम्यान 2 धीम्या लोकल (अप मार्गावर)
- चर्चगेट ते विरारदरम्यान 14 जलद लोकल (8 डाऊन मार्गावर व 6 अप मार्गावर)