रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (14:50 IST)

सभेत तलवार दाखवल्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

raj Thackeray
ठाणे- ठाण्यात काल झालेल्या सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे नेते अविनाश जाधव व रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी ठाण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा भाषणापूर्वी राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली आणि ठाकरे यांनीही ही तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावली होती. याच कारणावरुन आता राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.