मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (16:11 IST)

राजसाहेब बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, कोळी भगिनींनी घेतली राज यांची भेट

“राजसाहेब बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येतो आहे. आमचा व्यवसाय मंदावला आहे तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता” अशी मागणी करत मुंबईतल्या डोंगरी भागातील कोळी भगिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या महिला थेट कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आल्या होत्या. त्यांनी बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा अशी मागणी केली. राज ठाकरेंनी त्यांच्याशी काही वेळ संवाद साधला आणि प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं.
 
परप्रांतीयांऐवजी महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना रोजगाराची, व्यवसायाची संधी मिळावी यासाठी राज ठाकरे कायमच आग्रही असतात. त्यांच्या भाषणांमधून त्यांच्या वक्तव्यांमधून आणि मनसेच्या आंदोलनांमधून ही भूमिका वारंवार स्पष्ट झाली आहे. हे ठाऊक असल्यानेच मुंबईतल्या कोळी महिलांनी राज ठाकरेंची भेट घेऊन परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटवण्याची मागणी केली आहे.