1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified गुरूवार, 19 जानेवारी 2023 (15:12 IST)

राऊत म्हणतात मोदींनी 'ही' सूचना करावी मगच महाराष्ट्रात यावं

sanjay raut
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अद्यापही शमलेला नाही. याच वादावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी ते कर्नाटकात जाणार आहेत. त्यामुळे कर्नाटक सीमाभागात अत्याचार सुरू आहेत. कर्नाटकातून येताना त्यासंदर्भात तेथील मुख्यमंत्र्यांना सूचना करून महाराष्ट्रात याबाबत घोषणा करावी, असं आवाहन संजय राऊतांनी मोदींना केलं आहे.
 
शिवसेनेच्या कार्यकाळात महापालिकेने जी कामे केली आहेत, त्या कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. यातच शिवसेनेचं यश आहे. आम्हाला त्याचा आनंद आहे. शिवसेनेमुळे ज्या कामांना गती मिळाली त्या कामांचं उद्घाटन करून मोदी प्रचारांचं भूमिपूजन करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor