शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (08:59 IST)

डॉक्टर, नर्स यांच्याकडून लहान मुलांची विक्री, टोळी गजाआड

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लहान मुले गायब होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. आता या प्रकरणाचा छडा लागला असून डॉक्टर, नर्स यांच्याकडून लहान मुलांची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. क्राईम विभागा्च्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली कारवाई करण्यात आली आहे.
 
मुंबई क्राईम विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांना मुंबईत लहान मुलांची खरेदी विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. वांद्रे खेरवाडी येथील ज्ञानेश्वर नगरातील महिलांनी आपली मुलं एजंट मार्फत विकल्याच समजताच त्या महिलांना पोलिसानी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर ज्या एजंटनी ही मुलं विकली आहेत, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. तपासाची सुरू असतानाच लहान मुलांची विक्री करणाऱ्या टोळीपर्यंत पोलीस जाऊन पोहोचले. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या टोळीत एक डॉक्टर, एक नर्स, एक लॅब टेक्निशियन आणि सहा एजंट्सचा समावेश होता. या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
या टोळीतील सहा एजंटमध्ये पाच महिला आहेत. हे रॅकेट ज्या महिलांना मुलं होणार आहे, मात्र त्या मुलाचं पालन पोषण करण्यास महिला सक्षम नाहीत. अशा महिलांचा शोध घ्यायचं. त्यांनी बाळाला जन्म दिला की, या नवजात मुलांची खरेदी विक्री व्हायची. आतापर्यंत या टोळीने तीन मुलांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार केला असून, तो पोलीस तपासात उघडकीस झाला आहे. अडीच ते साडे तीन लाख रुपयांना मुलं विकली जात होती.