शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (16:19 IST)

समीर वानखेडे यांच्या वडिलांकडून हिंदू असल्याचे पुरावे सादर

समीर वानखेडे यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असून समीर वानखेडेंच्या लग्नातील निकाहनामा याच्यावरून राजकारण तापलं आहे. धर्म आणि लग्नावरून होणारे सर्व आरोप फेटाळत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी हिंदू असल्याचे पुरावे सादर केले आहेत. 
 
समीर वानखेडेंच्या लग्नाच्या वेळी दोन्ही कुटुंबीय मुस्लीम असल्याचा दावा त्यांचं लग्न लावणाऱ्या काझींनी केला आहे. मात्र, हा दावा समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी फेटाळून लावला आहे. “लग्नाच्या वेळी दोन वेगवेगळे धर्म असले, तर निकाह होत नाही. मुस्लीम धर्माच्या नियमानुसार दोघं एकाच धर्माचे असतील तरच निकाह कबूल होतो. हिंदू-मुस्लीम यांच्यात निकाह होत नाही. त्यामुळे कदाचित माझ्या पत्नीने तिथे मुस्लीम वगैरे लिहिलं असेल. प्रेमाने काहीतरी लिहिलं असेल. पण माझ्या सर्व कागदपत्रांमध्ये हिंदूच आहे”, असा दावा त्यांनी केला आहे. 
 
नवाब मलिक यांचे आरोप आकसापोटी असल्याचा दावा समीर वानखेडे यांच्या वडिलांनी ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे. आम्ही धर्मांतर केलें नाही. नवाब मलिक यांनी आज दाखवलेले लग्नाचे सर्टिफिकेट खरे आहे. मात्र त्यावर माझे नाव दाऊद कसे आले हे माहीत नाही. आम्ही atrocity act अंतर्गत तसेच मानिसक छळ यासाठी नवाब मलिक यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी कायदेशीर लढाई लढणार असल्याचंही ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.