बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2022 (15:17 IST)

माता-पित्याने अमानुष मारहाण करून चमचा, चाकू आणि कात्रीने गरम चटके दिल्याचा खळबळजनक प्रकार

rape
मुलाला त्याच्याच माता-पित्याने अमानुष मारहाण करून चमचा, चाकू आणि कात्रीने गरम चटके दिल्याचा खळबळजनक प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वयोवृद्ध आजीच्या तक्रारीवरून तिच्याच मुलासह सुनेविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. लवकरच या माता-पित्याची पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
 
६५ वर्षांची वयोवृद्ध महिला तिचे पती, मुलगा, सून तसेच १३ आणि ७ वर्षांच्या नातवांसोबत दादर परिसरात राहते. त्यांचा दिवा येथे स्वतःचा फ्लॅट असून गेल्या १२ वर्षांपासून ती तिच्या पतीसोबत तिथेच राहत होती. गेल्या महिन्यापासून ती दादर येथे मुलाच्या घरी राहायला आली होती. तिचा मुलगा काहीच कामधंदा करीत नसून त्यांच्या मालकीचे दोन गाळे आणि दोन फ्लॅट आहेत. या फ्लॅटसह गाळ्यांच्या भाड्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तिचा १३ वर्षांचा नातू दादरच्या एका नामांकित शाळेत सहावीत शिकतो. त्याने त्याच्या मोबाईलवर देवाची गाणी लावली होती, परंतु मोबाईल घेतल्याच्या रागातून त्याला त्याच्या आईने बेदम मारहाण केली.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor