गुरूवार, 24 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 24 एप्रिल 2025 (17:06 IST)

मुंबई: २१ व्या मजल्यावरून बाल्कनीतून पडून ७ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

baby legs
Mumbai News: महाराष्ट्रातील मुंबईमध्ये बुधवारी दुपारी विरारच्या बोलिंज भागात एका इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून पडून सात महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खिडकी बंद करताना मुलाच्या आईचा तोल गेल्याने ही भयानक घटना घडली. 
मिळालेल्या माहितीनुसार विरार पश्चिमेतील जॉय विले निवासी संकुलातील पिनॅकल बिल्डिंगमध्ये ही घटमहाराहस्त्रातील ना घडली. विकी सदाणे आणि पूजा सदाणे या जोडप्याने लग्नाच्या सात वर्षांनंतर बाळाचे स्वागत केले. घटनेच्या फक्त एक दिवस आधी, बाळाला सात महिने पूर्ण झाले होते. दुपारी घडलेल्या घटनेच्या वेळी विकी सदाणे कामावर होता. काही नातेवाईक मुलाला पाहण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. खिडकी बंद करण्याचा प्रयत्न करत असताना, पूजा सदाणे खिडकीजवळ साचलेल्या पाण्यावर घसरली, ज्यामुळे तिचा पाय घसरला. बाळ खांद्यावरून पडून २१ व्या मजल्यावरून खाली पडले दुर्दैवाने बाळाचा जागीच त्याचा मृत्यू झाला.
Edited By- Dhanashri Naik