पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार गुरुवारी सर्वपक्षीय बैठक घेणार
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार गुरुवारी सर्वपक्षीय बैठक घेणार आहे. ही बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होईल. हल्ल्यानंतरची परिस्थिती, सुरक्षा उपाययोजना आणि भविष्यातील रणनीती यावर या बैठकीत चर्चा केली जाईल ज्यामध्ये सर्व पक्षांचे नेते सहभागी होतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्व पक्षांना घटनेशी संबंधित माहिती देतील. काँग्रेससह इतर अनेक विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली होती. या बैठकीत पाकिस्तानविरुद्ध पुढील रणनीतीवर चर्चा होऊ शकते. अशी माहिती समोर आली आहे .
Edited By- Dhanashri Naik