बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (09:50 IST)

राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची आज बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या कामगिरीचा आढावा घेण्याबरोबरच राज्यातील विविध प्रश्नांवरही चर्चा केली जाणार असल्याचे समजते.
 
मागील महिन्यातही पवारांनी मंत्र्यांची अशी बैठक घेतली होती. ही दुसरी बैठक राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी होत असल्याने अधिवेशनाबाबतही या बैठकीत चर्चा होऊ शकते.
 
कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकुलता दर्शविल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि खुद्द शरद पवार यांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत पक्षाची भूमिका काय असावी, हे पवार या बैठकीत स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तसेच एनपीआरबाबतही पक्षाने काय भूमिका घ्यावी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.