शनिवार, 27 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (17:14 IST)

धक्कादायक ! अपंग मुलीवर फिजिओथेरपिस्ट कडून बलात्कार, आरोपीला अटक

Shocking! Accused arrested for raping disabled girl by physiotherapist Maharashtra News Mumbai News Santakruz disabled teenage girl  rape News In Marathi  अपंग मुलीवर फिजिओथेरपिस्ट कडून बलात्कार News In Marathi Webdunia Marathi
मुंबईतील सांताक्रूझ येथील एका क्लिनिक मध्ये एका 40 वर्षीय फिजिओथेरपिस्ट ने एका 16 वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मुलगी शारीरिकदृष्टया अपंग( disabled teenage girl) असून मुकी आहे. त्यासाठी तिला उपचारासाठी फिजिओथेरपिस्ट क्लिनिक मध्ये तिचे पालक नेत असे . आरोपी फिजिओथेरपिस्ट वर्षभरापासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत  होता. मंगळवारी मुलीने आपल्या पालकांना या घटनेची माहिती मोबाईलवर मेसेज पाठवून दिली. पालकांनी ताबड़तोब गुरुवारी पोलिसात फिजिओथेरपिस्टच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आई वडील आपल्या अपंग मुक्या मुलीला सांताक्रूझ मधील असलेल्या या फिझिओथेरेपी सेंटर वर उपचारासाठी  घेऊन जात होते. मुलगी आत केबिन मध्ये जायची आणि आईवडील बाहेर बसायचे हा नराधम तिच्यावर बलात्कार करत होता, याची आई वडिलांना काहीच कल्पना नव्हती. नंतर मुलीने आई वडिलांना मोबाईलवर मेसेज केल्यावर ही घटना उघडकीस आली. आपल्या मुलीसह असे घडले आहे हे कळतातच आई वडिलांना धक्काच बसला आणि त्यांनी आरोपीची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात  बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला त्याच्या क्लिनिक वरून अटक केली असून आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसाची कोठडी सुनावली आहे.