मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (14:44 IST)

न्यायाधीशांच्या चेंबर मध्ये साप !

मुंबई उच्च न्यायाधीशांच्या चेंबर मध्ये साप आढळल्याचे वृत्त मिळाले आहे.  न्यायाधीशांच्या चेंबर मध्ये साप आढळल्यानंतर न्यायालयात खळबळ उडाली होती. सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असल्याचे आढळून आले आहे.हा साप कधी आणि कुठून आला याची माहिती मिळाली नाही. चेंबर मध्ये साप असल्याचे समजल्यावर परिसरात खळबळ उडाली होती. सापाला सर्पमित्राच्या साहाय्याने पकडून सुरक्षित स्थानी सोडण्यात आले आहे. साप बिनविषारी असल्याचे समजले आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.