शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (21:47 IST)

सीएसएमटी ते अमृतसर आणि चेन्नई दरम्यान स्पेशल ट्रेन

मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी ते अमृतसर आणि चेन्नई दरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 01057 सीएसएमटी - अमृतसर ट्रेन 10 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज रात्री 11.30 वाजता मंबईहून सुटेल आणि अमृतसरला तिसर्‍या  दिवशी सायंकाळी  4.15 वाजता पोहोचेल. परतीकरिता 01058 ट्रेन 13 एप्रिलपासून अमृतसर येथून दररोज सकाळी 8.45 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला तिसर्‍या दिवशी रात्री 12.05 वाजता मुंबईत पोहोचेल.
01159 ट्रेन 10 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सीएसएमटी येथून दररोज दुपारी 12.45 वाजता सुटेल आणि चेन्नईला दुसर्‍या दिवशी सकाळी 10.50 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी 01160 ट्रेन 11 एप्रिलपासून दररोज दुपारी 1.25 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला दुसर्‍या  दिवशी दुपारी 12.30 वाजता पोहोचेल.