शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (21:03 IST)

राज्य सरकारची एसटी महामंडळाला ‘इतक्या’ कोटी रुपयांची तातडीची मदत

st buses
मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाला तातडीची मदत जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारने 300 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला पगारासाठी 360 कोटी रुपयांच्या निधीची गरज असते. पण सरकारने 300 कोटी रुपयांचीच मदत जाहीर केली आहे.
या मदतीवरुन महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. जेवढी मागणी केली तेवढा निधी सरकारने द्यावा, अन्यथा सरकारविरोधात पुन्हा संघर्ष उभा करावा लागले असा इशारा बरगे यांनी दिली आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे एसटी कर्मचारी शिंदे सरकारवर नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 360 कोटी रुपये लागतात. परंतु 3 महिन्यामध्ये शिंदे सरकारकडून फक्त 600 कोटी रुपयांची रक्कमच राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिला असल्याची माहिती महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. एसटी महामंडळाकडून 738 कोटी रुपयांची मागणी केली होती. आता फक्त 300 कोटी रुपयेच देण्यात आले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor