गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (08:14 IST)

आझाद मैदान न सोडण्याचा राज्यभरातील शेकडो शिक्षकांचा निर्धार

Protest
मुंबई – राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे. अनुदानाच्या मागणीसाठी गेली २० ते २२ वर्षे आंदोलन करणाऱया शिक्षकांनी आता 100 टक्के अनुदान मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार केला आहे.
 
विनाअनुदानित शाळांमधील ८० ते ९० हजार शिक्षक अनुदानाच्या मागणीसाठी मागील कित्येक वर्षे आंदोलन करीत आहेत. मात्र या शिक्षकांना सेवा संरक्षण आणि अनुदान देण्याचा निर्णय आतापर्यंत झालेला नाही. आता या शिक्षकांनी ‘करो या मरो’ची लढाई सुरू केली असून अनुदान घेतल्याशिवाय आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
राज्यातील अंशतः अनुदानित २० आणि ४० टक्के अनुदान घेणाऱया, त्रुटी पूर्तता केलेल्या तसेच अघोषित असणाऱया सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना ‘सरसकट’ हा शब्द काढून पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी राज्य विनाअनुदानित व अनुदानित शाळा कृती समितीने केली आहे. राज्यातील विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिरंगाई होत असल्याचा आरोप कृती समितीचे मुंबई विभागीय अध्यक्ष संजय डावरे यांनी केला आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor