गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (21:23 IST)

खत आणि किटकनाशकांचा एक कोटी ७५ लाख रुपये किमतीचा साठा जप्त

Stocks of fertilizers and pesticides worth Rs 1 crore 75 lakh seizedखत आणि किटकनाशकांचा एक कोटी ७५ लाख रुपये किमतीचा साठा जप्त  Marathi Mumbai News In Webdunia Marathi
मुंबईजवळ असलेल्या भिवंडी लगत असलेल्या  एका गोदामात पुणे कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाने टाकलेल्या छाप्यात पावणे दोन कोटी रुपये किंमतीचा खत आणि किटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. भिवंडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या प्रकरणात कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाचे तंत्र अधिकारी किरण जाधव यांना भिवंडी जवळील एका गोदामात खते आणि कीटकनाशकांचा बेकायदा साठा करण्यात आला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. जाधव यांनी या माहितीची खात्री केल्यानंतर किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली कारवाई पथकाने गोदाम परिसरात सापळा लावला. या पथकाने भिवंडीतील एका वेअर हाऊसवर छापा टाकला. अरविंद पटेल यांच्या नावे असलेल्या गोदामात खत, कीटकनाशक ठेवण्यात आली होती. या साठ्या संदर्भात कारवाई पथकाने पटेल यांच्याकडे कागदपत्रे मागितली. खत साठवणुकीच्या परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे आढळले. साठा बेकायदा असल्याचे स्पष्ट करीत कारवाई पथकाने तो जप्त केला.
कीटकनाशके, विद्राव्य खते, अन्नद्रव्य असा एकूण एक कोटी ७५ लाख रुपये किमतीचा साठा जाधव यांच्या पथकाने जप्त केला आहे.