शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (09:23 IST)

कोळसा उतरवताना ट्रॉली कोसळली, ३ बहिणींचा झोपेत मृत्यू

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात एक भीषण अपघात घडला. येथे कोळसा उतरवताना कंटेनर ट्रॉली कोसळल्याने तीन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू झाली आहे.
 
या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोळसा भरलेली ट्रॉली झोपडीवर कोसळल्याने संपूर्ण घरच कोळशाच्या खाली गाडले गेले आणि त्यात घरातील सदस्यही होते.
 
मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली ज्यात कोळसा रिकामे करताना ट्रकचा शॉकअप्सर अचानक तुटला. नंतर कोळशाने भरलेल्या ट्रकची ट्रॉली शेजारी असलेल्या झोपडीवर कोसळली. या झोपडीत वीटभट्टीवर काम करणारे मजूर आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते.
 
तीन ते सात वर्षे वयोगटातील या मुली एका वीटभट्टी कामगार-दाम्पत्याच्या मुली होत्या.  या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी झोपडीत मजुराची पत्नी आणि तीन मुले होती. दुर्दैवाने या अपघातात तीन बहिणींचा मृत्यू झाला. तिन्ही बहिणी झोपडीत झोपल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे.
 
चार मुलींच्या आईने तिन्ही भावंडांना वीटभट्टीतील एका गळक्या झोपडीत झोपू दिले आणि चिमुकल्याला कपड्यांपासून बनवलेल्या पाळणामध्ये बसवले आणि त्यांच्या झोपडीच्या बाजूला असलेल्या झाडाला लटकवले होते. दोन वर्षांची चिमुरडी झोपडीपासून काही अंतरावर असल्याने ती सुरक्षितपणे बचावली. तसेच पीडितेचे वडील घटनेच्या वेळी बाहेर शौचालयात गेले होते.