1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 26 जानेवारी 2022 (18:51 IST)

मुंबईत 5 मजली इमारत कोसळली, काही नागरिक अडकले

A 5-storey building collapsed in Mumbai
मुंबई: वांद्रे परिसरातील एका 5 मजली इमारतीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली 5 ते 6 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. 
 
वांद्रे येथील बेहरामपाडा येथील प्राध्यापक अनंत काणेकर मार्गावर रझा मशीदीजवळ असलेली ही इमारत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
 
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 6 जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे बचावकार्य अजूनही सुरू आहे.